पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी देहूरोडमधील पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद   

पिंपरी : काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या देहूरोड येथील एका नागरिकाच्या मोबाईलमध्ये पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी कैद झाले आहेत. या दोन दहशतवाद्यांची छायाचित्र नकळतमध्ये मोबाईलमध्ये कैद झाली आहेत.
 
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. या दहशतवाद्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. तसेच, भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.तीन संशयितांची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. शिवाय, चार दहशतवाद्यांची छायाचित्रेदेखील समोर आली आहेत. याशिवाय, घटनेची अनेक चित्रफिती दररोज समोर येत आहेत. यामध्ये दहशतवादी कशाप्रकारे कौर्य करत आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहेत. अशातच दोन दहशतवाद्यांची छायाचित्रे देहूरोड येथील एका नागरिकाच्या कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.
 
देहूरोडमधील रहिवासी असलेले श्रीजीत रमेशन हे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. पहलगामपासून साडेसात किलोमीटरवर असलेल्या बेताब खोर्‍यात श्रीजीत हे मोबाईलमध्ये आपल्या मुलीचा रिल्स तयार करत होते. हे रिल्स काढणे सुरू असतानाच संशयित दोन दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्याचे त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झाले आहेत. श्रीजित रमेशन यांनी याबाबतची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिली आहे. आता एनआयएकडून याची तपासणी केली जाणार आहे.

Related Articles